Advertisement

राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवर कॅमेरे लागतील - चंद्रकांत पाटील

गृहमंत्रिपदावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवर कॅमेरे लागतील - चंद्रकांत पाटील
SHARES

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी ३० डिसेंबरला होणार आहे. या विस्तारात शिवसेनेकडे असलेलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडं जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपदावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवर कॅमेरे लागतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

अर्थखातं, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहखातं पण शिवसेनेने दिलं. मग यांनी स्वत:कडे ठेवलं काय फक्त मुख्यमंत्रिपद? असा सवाल करत शिवसेनेने गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये, नाहीतर मातोश्रीवर देखील कॅमेरे लागतील असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 

मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १३ मंत्री तर काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शिवाजी पार्क येथे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्याचं गृहमंत्रीपद सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडं गृह खातं जाणार आहे. गृहमंत्रीपदासाठी अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांची नावं चर्चेत आहेत. 



हेही वाचा -

हिंमत असेल तर अटक करून दाखवा- प्रकाश आंबेडकर

विविध विषयांवर सेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा