हिंमत असेल तर अटक करून दाखवा- प्रकाश आंबेडकर

'भाजपमध्ये हिंमत असेल, तर मला अटक करा, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध आहे’, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

हिंमत असेल तर अटक करून दाखवा- प्रकाश आंबेडकर
SHARES

नागरिकत्व दुरूस्ती कायद्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी आंदोलन करण्यात आलं. दादर टी-टी परिसरात हे आंदोलन करण्यात आलं असून, अनेकांनी या आंदोलनात हजेरी लावली होती. त्यावेळी या आंदोलकांना मार्गदर्शन कराता प्रकाश आंबेडकर यांनी 'भाजपमध्ये हिंमत असेल, तर मला अटक करा, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध आहे’, असं वक्तव्य केलं.

हक्कावर गदा

'या देशात मोदी आणि शहा हे हुकूमशाही लादत आहेत. या देशात नागरिक हा राजा आहे, त्याच्या हक्कावर गदा येणार असेल तर या देशात हा कायदा लागू होऊ देणार नाही’, असा इशारा आंबेडकर यांनी दिला. तसंच, या देशातील सुजाण नागरिकांना स्थानबद्धता केंद्रांमध्ये जायचं नसेल तर त्यांनी या कायद्याला विरोध करायलाच हवा’, असंही आंबेडकर यांनी म्हटलं.

हेही वाचा - नागरिकत्व कायदा हिंदूच्याही विरोधातील - प्रकाश आंबेडकर

स्थानबद्धता केंद्र

'नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सरकार पडले पाहिजे. २ लाख जण मावतील इतकं मोठं स्थानबद्धता केंद्र (डिटेन्शन कँप) बांधले जात आहे, तिथे जायचे नसेल, तर मोदी सरकार पाडा’, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं. 'अमित शहा देशाची दिशाभूल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राजीनामा मागणार का?’, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.


भाजपचा कट

अनेक जणांकडे रहिवासी पुरावे नाहीत, स्थानबद्धता केंद्रे उभारल्यास तोडून टाकू, कायद्याला संघर्षानं उत्तर द्यावं लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा हा कट आहे. भाजप अराजकता माजवत आहे, असा आरोप त्यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा ४० टक्के हिंदूंच्यांही विरोधात आहे, असंही त्यांनी म्हटलं.हेही वाचा -

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मार्च

एसटी प्रवासभाडं सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढसंबंधित विषय