Advertisement

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मार्च

केंद्र सरकारनं लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत विशाल संविधान सन्मान मार्च आयोजन करण्यात आलं आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मार्च
SHARES

केंद्र सरकारनं लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत विशाल संविधान सन्मान मार्च आयोजन करण्यात आलं आहे. संविधान सन्मान मंचच्यावतीनं या मार्चचं आयोजन करण्यात आलं असून. हा संविधान सन्मान मार्च शुक्रवार दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून निघणार आहे. तसंच, या मोर्चाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

संविधान सन्मान मार्च

संविधान सन्मान मार्च हा ऑगस्ट क्रांती मैदानातून निघून गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी समाप्त होणार आहे. या संविधान मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसंच, यावेळी सुरेश हावरे, सुभाष कांबळे, रणजित सावरकर, अनंत पळशीकर, आमदार अतुल भातखळकर हे या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.

कायद्याविरोधात आंदोलन

मुंबईत मागील काही दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात अनेक संघटनांच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे. आंदोलनाला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित राहून आपला कायद्याला असलेला विरोध दर्शवत आहेत. त्यामुळं भाजप सरकारचा हा कायदा आणि त्या कायद्याच्या समर्थनात काढला जाणारा मोर्चाचा प्रभाव मुंबईकरांवर पडणार ता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

SBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद

नागरिकत्व कायदा हिंदूच्याही विरोधातील - प्रकाश आंबेडकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा