आशिष शेलार म्हणतात 'बेस्ट नौटंकी'


SHARE

'भाजपा सरकार, नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय म्हणे जनविरोधी? आता स्वत: बेस्टची दरवाढ केली. यात काय कामगारांचे हित? हीच यांची “बेस्ट नौटंकी” अशा शब्दात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे.


ट्विटरवरून शिवसेवेवर साधला निशाणा

बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या बेस्ट भाडेवाढीविरोधात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असतानाच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शेलार यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेवेवर निशाणा साधत टीका केली आहे. पुढच्या वर्षी बेस्टची भाडेवाढ होणार आहे. यामध्ये बेस्ट तिकीट दरासोबत बेस्ट पासमध्ये देखील भाडेवाढ होणार असल्यामुळे प्रवासी सध्या चिंतेत आहेत. एकीकडे बेस्ट तोट्यात जात असताना या मध्यमातून नफा कमवायचे साधन त्यांनी उचललेले दिसत आहे. सोशल मिडीयावर शेलारांनी केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. आता यावर बेस्ट समिती वा शिवसेना काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संबंधित विषय