भाजपाच्या निवडणूक कार्यालयाची तोडफोड

 Malad
भाजपाच्या निवडणूक कार्यालयाची तोडफोड
Malad, Mumbai  -  

मालाड - मालाड पश्चिमच्या चिंचोली बंदर येथे भाजपाचे निवडणूक प्रचार कार्यालय अज्ञात व्यक्तीने तोडल्याची घटना सोमवारी घडली. भाजपाच्या प्रभाग क्रमांक 47 च्या उमेदवार जया सतनाम सिंग तिवाना यांच्या प्रचारासाठी येथे महापालिकेची परवानगी घेऊन कार्यालय सुरू करण्यात आले होते. सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हे कार्यालय तोडले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला असल्याची माहीती भाजपा वॉर्ड क्रमांक 47 च्या महिला अध्यक्ष अलका कांबळी यांनी दिली.

Loading Comments