'सबका साथ सबका विकास'ला खीळ

  Kurar Village
  'सबका साथ सबका विकास'ला खीळ
  मुंबई  -  

  कुरार व्हिलेज - 'सबका साथ सबका विकास' म्हणणाऱ्या भाजपाच्या या घोष वाक्याला त्यांच्याच पक्षात खीळ बसलीय. भाजपाच्या माजी नगरसेविका सुचित्रा नाईक यांना गेले सहा महिने पुन्हा कुरारमधून उमेदवारी देणार असल्याची आशा दाखवण्यात आली होती. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन करून तशी कामेही करण्यात आली होती. मात्र ऐन तिकीट वाटपाच्या वेळी रात्री नाईक यांची उमेदवारी काढून मनसेतून भाजपात प्रवेश केलेल्या हेमंत शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांना देण्यात आली.

  नाईक यांचा मुलगा केतन नाईक यांना मनसेतून उमेदवारी मिळणार होती. मात्र सुचित्रा नाईक यांनी शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे सांगत मुलाला माघार घेण्यास सांगितले होते. मात्र आता सुचित्रा नाईक यांनाही तिकीट मिळणार नसल्यामुळे नाईक कुटुंब निवडणुकीपासून दूर रहाणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.