Advertisement

पारदर्शक, समाजसेवक...


SHARES

दादर - शिवसेनेची साथ सोडल्यानंतर आता भाजपाला स्वबळावर मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे वेध लागले आहेत. भाजपा मित्रपक्षासह पालिकेच्या 114 पेक्षा अधिक जागांवर यश मिळवेल, असा दावा भाजपाचे मुंबई महानगरपालिकेतील गटनेता मनोज कोटक यांनी केलाय. पालिका निवडणुकीत पारदर्शकतेचा मुद्दा कळीचा ठरणार आहे, याची एव्हाना सर्वसामान्य मुंबईकरांना खात्री पटली आहे. भाजपाने पुढे रेटलेल्या पारदर्शकतेच्या मुद्दयाबरोबरच आता आणखी एक मुद्दा कोटक महत्त्वाचा करु पाहत आहेत. समाजसेवा. भाजपाचा प्रत्येक उमेदवार हा समाजसेवक असल्याचं प्रशस्तीपत्र देणाऱ्या कोटक यांनी केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात मुंबई महानगरपालिकेला बहाल केलेलं सर्वात पारदर्शक महानगरपालिकेचं प्रशस्तीपत्र मात्र मान्य करायला नकार दिलाय. ‘मुंबई लाइव्ह’ च्या ‘उंगली उठाओ’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी ‘मुंबई लाइव्ह’ कार्यालयात आलेल्या कोटक यांनी पारदर्शकता, भ्रष्टाचार, समाजसेवा आदी शब्दांच्या भाजपालेखी असलेल्या व्याख्या सांगितल्या. मुलुंडमधील डंपिंग ग्राउंड बंद करण्यात शिवसेनेला कधीच स्वारस्य नव्हतं, असा आरोप करणाऱ्या कोटक यांनी भाजपाची सत्ता आल्यास मुंबईतील कचऱ्याचं नियोजनबद्ध विघटन करु, असं आश्वासनही देऊन टाकलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा