टी वॉर्डवर भाजपाचा झेंडा

Mumbai
टी वॉर्डवर भाजपाचा झेंडा
टी वॉर्डवर भाजपाचा झेंडा
टी वॉर्डवर भाजपाचा झेंडा
टी वॉर्डवर भाजपाचा झेंडा
टी वॉर्डवर भाजपाचा झेंडा
See all
मुंबई  -  

मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि मुलुंडमध्ये भाजपाचा दणदणीत विजय झाला. सर्व पक्षांचा पराभव करत सहाच्या सहा जागांवर भाजपाचा घसघशीत असा विजय झाला. प्रभाग क्रमांक 103 मधून मनोज कोटक, प्रभाग क्रमांक 104 मध्ये प्रकाश गंगाधरे, प्रभाग क्रमांक 105 मधून रजनी केणी, प्रभाग क्रमांक 106 मधून प्रभाकर शिंदे, प्रभाग क्रमांक 107 मधून समिता कांबळे तर प्रभाग 108 मधून खासदार किरिट सोमय्या यांचे सुपुत्र नील सौमेया यांचा विजय झाला आहे. नील सोमय्या आणि शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केलेले प्रभाकर शिंदे यांच्या निकालाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती परंतु त्यांनीही विजयाचा झेंडा फडकावलाच.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.