SHARE

घाटकोपर - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घाटकोपरमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी बाईक रॅली काढली. या रॅलीत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीला घाटकोपर पूर्व मधील रमाबाई आंबेडकरनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन सुरुवात झाली. घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस रोड, पारशीवाडी, माणिकलाला मार्ग, जगदुशानगर, अमृतनगर आणि विक्रोळी पार्क साईट अशी प्रचार यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली.

प्रचार यात्रेत एन वॉर्डच्या एकूण 11 प्रभागातील भाजपा उमेदवारांच्या प्रचार करण्यात आला. तसंच या रॅलीत बाईकसोबत रिक्षांचा देखील मोठा संख्येने सहभाग होता. या वेळी आमदार राम कदम, खासदार किरीट सोमय्या आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या