Advertisement

प्रतीक्षानगरमध्ये राबवली स्वच्छता मोहीम


प्रतीक्षानगरमध्ये राबवली स्वच्छता मोहीम
SHARES

शिव - स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रतीक्षानगरमध्ये 26 डिसेंबरला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. भाजप वॉर्ड क्र. 176 (सायन कोळीवाडा विधानसभा)चे कार्यकर्ता संतोष साबळे यांनी ही मोहीम राबवली. या मोहिमेत 50 स्वयंसेवकांचा समावेश होता. गटारे, नाल्यांची साफसफाई अशी कामे या मोहिमेंतर्गत करण्यात आली. यावेळी परिसरातील राहिवाशांशी संवाद साधून त्यांना भेडसावऱ्या समस्येचं निवारण कसं करता येईल याकडेसुद्धा लक्ष देण्यात आलं. "ही मोहीम आता दर शनिवार आणि रविवारी या विभागात राबवली जाईल असं आयोजक संतोष साबळे यांनी स्पष्ट केलं".

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement