भाजपा हा गुंडांचा पक्ष - नवाब मलिक

 Vidhan Bhavan
भाजपा हा गुंडांचा पक्ष - नवाब मलिक
भाजपा हा गुंडांचा पक्ष - नवाब मलिक
भाजपा हा गुंडांचा पक्ष - नवाब मलिक
See all

नरिमन पॉइंट - भाजपानं महाराष्ट्र माफियामुक्त करण्याची घोषणा केली. पण भाजपाचेच खासदार किरीट सोमय्या वारंवार माफियामुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात. मात्र या भाजपामध्ये गुंडांचीच भरती होत आहे. दाऊद टोळीतील निकटवर्तीय रियाज भाटी भाजपाचा कार्यकारिणी सदस्य आहे. ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला आहे,' अशी टीका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपा हा गुंडांचा पक्ष बनला आहे, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केला.

'गुंडांच्या जोरावर महाराष्ट्र काबीज करण्याचा भाजपाचा कट असेल तर तो कट महाराष्ट्राची जनता उधळून लावेल. भाजपाला महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तरप्रदेश करायचा असेल, तर ते महाराष्ट्राची जनता होऊ देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. दोन्ही पक्षांची भूमिका एकत्र लढायची असून त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल,' असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments