भाजप नेते आशिष शेलारांना पितृशोक


भाजप नेते आशिष शेलारांना पितृशोक
SHARES
भाजपा नेते आमदार  आशिष शेलार यांचे वडिल बाबाजी शेलार यांचे मंगळवारी सायंकाशी दीर्घ आजाराने निधन झाले.ते 85 वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचारससुरू होते. 

गेल्या काही महिन्यांपासून बाबाजी शेलार हे आजारी होते. आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी वैशाली, मुलगा माजी नगरसेवक विनोद शेलार आणि आमदार अँड. आशिष शेलार, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. बाबाजी शेलार हे आयकर खात्यातून सेवानिवृत्त झाले होते. अध्यात्माची त्यांना विशेष गोडी होती. अध्यात्मिक वाचन,चिंतन असा त्यांचा आवडीचा विषय होता.

दरम्यान, आमदार अँड.आशिष शेलार आणि शेलार कुटुंबीयांनी सर्व कार्यकर्ते,मित्रपरिवार यांना आवाहन केले आहे की, आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आपण सगळे आमच्यासोबत सदैव आहातच त्यामुळे सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कृपया प्रत्यक्ष भेटी ऐवजी मोबाईल, मेसेज द्वारेच भेटू. आपण सगळे आम्हाला सहकार्य कराल, अशी विनंती त्यांनी केली आहे.
संबंधित विषय