कोकण महोत्सवाचं आयोजन

 Malad West
कोकण महोत्सवाचं आयोजन
कोकण महोत्सवाचं आयोजन
कोकण महोत्सवाचं आयोजन
कोकण महोत्सवाचं आयोजन
See all

मालाड - कुरारगावातल्या आप्पापाड्यात भाजपाच्या दिंडोशी विभागातर्फे कोकण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्या हस्ते या कोकण महोत्सवाचे उदघाटन करण्यात आलं. 14 नोव्हेंबरपर्यंत हा कोकण महोत्सव सुरू राहील. या महोत्सवात दशावतार, मराठी लावणी, हिंदी लोकप्रिय गीतं, जादूचे प्रयोग, भजन, साई चरित्र नाटक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्यासोबतच खवय्यांसाठी विविध खादयपदार्थ, लहान मुलांना आकाशपाळण्याचा आनंदही या महोत्सवात घेता येईल.

शुक्रवारी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी भाजप नेते प्रसाद लाड, माजी नगरसेविका सुचित्रा नाईक, कोकण विभाग परिषदेचे अध्यक्ष संकेत नलावडे, भारती भेंडे आदी उपस्थित होते. यावेळी कम्बोज यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

Loading Comments