Advertisement

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- किरीट सोमय्या

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- किरीट सोमय्या
SHARES

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालया (ईडी)ने नोटीस पाठवल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनिल परब यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालमत्तेच्या गैरव्यवहाराप्रकरणी अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले. ते म्हणाले, ठाकरे सरकारचे आणखी एक वसुली मंत्री अनिल परबांना आता ईडीकडे जाऊन कुठून किती वसुली करण्यात आली, हे सांगावं लागणार आहे.मग ते सचिन वाझेचे दर महिन्याचे १०० कोटी रुपये असो किवा आरटीओ ट्रान्सफरचे पैसे आणि दापोली रिसॉर्ट बांधला त्यासाठी पैसा कुठून आला त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे.

अनिल परब यांनी बेकादेशीररित्या रिसॉर्ट तर बांधलंच पण त्याचा मालमत्ता कर देखील भरला आहे, पण बेकायदेशीर काम करणाऱ्या परब यांना मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले असताना त्यांना मंत्रिमंडळात का ठेवलं गेलं आहे असा सवाल उपस्थित करतानाच अनिल परब यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीनुसार अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असं काहीतरी होईल, अशी पहिली प्रतिक्रिया अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) नोटीस मिळाल्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा