Advertisement

मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून वाचला, निलेश राणेंचा रोख कुणाकडे?

सचिन वाझे यांची बाजू घेणारे मुख्यमंत्री आता कुठे आहेत? असा प्रश्न विचारत भाजपचे (bjp) नेते निलेश राणे यांनी या प्रकरणात आणि सुशांत सिंह राजपूत तसंच दिशा सालियन प्रकरणात साम्य असल्याचा दावा केला आहे.

मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून वाचला, निलेश राणेंचा रोख कुणाकडे?
SHARES

सचिन वाझे यांची बाजू घेणारे मुख्यमंत्री आता कुठे आहेत? असा प्रश्न विचारत भाजपचे (bjp) नेते निलेश राणे यांनी या प्रकरणात आणि सुशांत सिंह राजपूत तसंच दिशा सालियन प्रकरणात साम्य असल्याचा दावा केला आहे. शिवाय ठाकरे सरकार आणि शिवसेनेवरही गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणावर भाष्य करताना, वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत??? आतंगवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाझे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असं स्पष्ट केलं. याचा अर्थ की शिवसेना या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा (shiv sena) आहे. तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी, अशी मागणी देखील निलेश राणे यांनी केली आहे.

हेही वाचा- चिन वाझेंचा गाॅडफादर कोण?, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

२५ फेब्रवारी- अंबानींच्या घरा बाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली. ५ मार्चला- मनसुख हिरेनची बॉडी सापडली. ६ मार्चला- तपास ATS कडे. पण २ मार्चलाच वाझेच्या घराकडचे CCTV गायब. हेच SSR आणि दिशा सालियानच्या केस मध्ये घडलं. पण तिथे आरोपी मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून आजपर्यंत वाचला, असं ट्विट करत निलेश राणे यांनी या प्रकरणातील साम्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचसोबत नितेश राणे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे आणि ठाकरे सरकार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्कॉर्पिओ ठेवली जाते, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यात वाझेंचा हात असल्याचं म्हटलं जातं. हा सर्व प्रकार एकटा माणूस करु शकत नाही. यामागे नक्कीच बड्या व्यक्ती आणि शक्ती असाव्यात. याची एनआयएने चौकशी करावी. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाइंट कोण आणि गॉडफादर कोण हे बाहेर येणार नाही, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

(bjp leader nilesh rane allegations on thackeray government in sachin vaze case)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा