Advertisement

“ज्या शिवसेनेवर कोकणाने प्रेम केलं, त्यांच्या तोंडाला तरी पानं पुसू नये”

मला असं वाटतं की ३ तासांमध्ये कुठला दुष्काळाचा किंवा चक्रीवादळाचा दौरा होतो. हे मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावं.

“ज्या शिवसेनेवर कोकणाने प्रेम केलं, त्यांच्या तोंडाला तरी पानं पुसू नये”
SHARES

ज्या शिवसेनेवर (shiv sena) कोकणाने प्रेम केलं, ज्यांनी सत्ता दिली त्या कोकणवासियांच्या तोंडाला तरी पानं पुसू नये, अशी अपेक्षा आहे. २१ कोटी कुठे गेले याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. इतका खर्च करुनही आरोग्य यंत्रणा ढेपाळलेली का आहे? याचं उत्तर पालक मंत्र्यांनी जनतेसमोर द्यावं, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आले. त्याच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते विमानाने रत्नागिरीत उतरले. रत्नागिरीतील आढावा घेऊन ते तासाभरात सिंधुदुर्गला गेले आणि तिथून पुन्हा रत्नागिरीला येऊन मुंबईकडे परतले. मला असं वाटतं की ३ तासांमध्ये कुठला दुष्काळाचा किंवा चक्रीवादळाचा दौरा होतो. हे मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावं. आम्हाला टीका करायची नाही. मुख्यमंत्री आले याचं समाधान आहे. परंतु जे समाधान या कोकणवासियांना मिळालं पाहिजे, ते मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी त्यांना विनंती आहे.

हेही वाचा- दीड वर्षांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर, तेव्हा कुणालाही उगाच सल्ले देऊ नका- चंद्रकांत पाटील

ज्या कोकणाने शिवसेनेवर प्रेम केलं आणि सत्ता दिली, त्या कोकणाच्या तोंडाला तरी पानं पुसू नये ही आमची अपेक्षा आहे. कोविडसाठी देण्यात आलेले २१ कोटी रुपये खर्च करून देखील येथील आरोग्य यंत्रणा ढेपाळलेली का आहे, हे आम्ही विचारणार आहोत, २१ कोटी कुठे गेले याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. ग्रामीण भागामध्ये सोय नाही, अॅम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, याचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं. भाजपच्या (bjp) माध्यमातून आम्ही १०५ बेड्स, तीन विधानसभा क्षेत्रात आॅक्सिजनची व्यवस्था असलेले बेड्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत. भाजप जिथं सेवा हाच धर्म मानून काम करत असताना, ज्या शिवसेनेला सत्ता दिली, मंत्रीपदे दिली, त्या कोकणवासियांना त्यांनी विसरू नये हीच आमची विनंती, असं प्रसाद लाड म्हणाले.

तर दुसरीकडे दीड वर्षांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) घराबाहेर पडलेत. तेव्हा उगाच त्यांनी कुणालाही सल्ले देऊ नयेत, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सुनावलं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी वादळाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी कोकणचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. ही पाहणी त्यांनी जमिनीवरूनच केली. प्रशासकीय यंत्रणांशी त्यांनी संवाद साधला.

मात्र तब्बल दीड वर्षांनंतर आज महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडलेत. सत्तेत आल्यापासून हवेत गेलेले त्यांचे पाय जमिनीवर आलेत; याचा आम्हाला आनंदच आहे. पण म्हणून त्यांनी 'कोणालाही' उगाच सल्ले देऊ नयेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम', प्रविण दरेकरांची टीका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा