Advertisement

दीड वर्षांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर, तेव्हा कुणालाही उगाच सल्ले देऊ नका- चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासोबत कोणताही दुजाभाव करत नाहीत. अशा अनेक वावड्या याआधीही उठवण्यात आल्या आहेत.

दीड वर्षांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर, तेव्हा कुणालाही उगाच सल्ले देऊ नका- चंद्रकांत पाटील
SHARES

दीड वर्षांनंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) घराबाहेर पडलेत. तेव्हा उगाच त्यांनी कुणालाही सल्ले देऊ नयेत, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवाई प्रवासावर टोमणा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावलं.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी वादळाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी कोकणचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. ही पाहणी त्यांनी जमिनीवरूनच केली. प्रशासकीय यंत्रणांशी त्यांनी संवाद साधला. तर मी स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांमार्फत माहिती गोळा करत आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव

त्यातच तब्बल दीड वर्षांनंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडलेत. सत्तेत आल्यापासून हवेत गेलेले त्यांचे पाय जमिनीवर आलेत; याचा आम्हाला आनंदच आहे. पण म्हणून त्यांनी 'कोणालाही' उगाच सल्ले देऊ नयेत. पंतप्रधानांना सुरक्षेच्या कारणास्तव हवाई पाहणी करण्याचा सल्ला देण्यात येतो, तशी पाहणी इंदिरा गांधी यांनीही केलेली आहे. निदान सल्ले देण्यापूर्वी इतिहासाची माहिती तरी घ्यावी, असा टोला चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी लगावला.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम', प्रविण दरेकरांची टीका

दुजाभाव नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासोबत (maharashtra) कोणताही दुजाभाव करत नाहीत. अशा अनेक वावड्या याआधीही उठवण्यात आल्या आहेत. त्यांनी गुजरातसाठी असं कोणतंही वेगळं पॅकेज जाहीर केलं नाही, तर देशभरात चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांमधील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये घोषित केले आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

एक रुपयाही मिळाला नाही

समाजातील बारा बलुतेदार आणि आठ नवे वर्ग अशा एकूण २० वर्गांना मदत जाहीर व्हावी, यासाठी वारंवार ओरडून ओरडून गळा सुकला, तेव्हा कुठं राजा उदार झाला. राजाने १,५०० रुपयांचं तुटपुंजं पॅकेज काढलं, पण त्यातला आजपर्यंत एकही रुपयाही या बांधवांना मिळालेला नाही, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली. 

(maharashtra bjp president criticised cm uddhav thackeray on konkan visit)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा