Advertisement

मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

कोकण आणि शिवसेनेचं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
SHARES

तौंते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचीच पाहणी करून आर्थिक मदत जाहीर केल्यावरून टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात विचारलं असता, मला त्यात राजकारण आणायचं नाही. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील. मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कोकण दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मालवणमधील चिवला बीच इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा आढावा घेऊन मदत जाहीर करु. शिवाय केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश देण्यात आले आहेत. आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचं असेल ते देखील आम्ही करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाला किती देते, हे बघणं महत्त्वाचं आहे. कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जातं, तितकंच प्रेम अशा संकटाच्या काळातसुद्धा केलं जावं, अशी आमची अपेक्षा आहे. निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी हेक्टरी ५० हजार म्हणजे एका झाडाला ५०० रूपये मदत घोषित केली होती. मात्र त्यावेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी भरघोस मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी (devendra fadnavis) केलं होतं.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम', प्रविण दरेकरांची टीका

त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, दलत्या हवामानामुळे राज्याच्या किनारपट्टीवर वादळं येऊ लागली आहेत. तौंतेची भीषणता गेल्या दोन दशकातील सर्वाधिक होती. वादळांमुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी जिल्ह्यांनी कायमस्वरुपी आराखडा तयार केला आहे. तो जलदगतीने पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी आणि निधी द्यावा. राज्य म्हणून आम्हाला शक्य आहे ती सर्व मदत करु. पण विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे आम्हीदेखील पंतप्रधानांना मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचं कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील असून योग्य ती मदत करतील असा विश्वास आहे.

तसंच कोकण आणि शिवसेनेचं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

(maharashtra cm uddhav thackeray reply devendra fadnavis on financial aid to konkan after cyclone tauktae)

हेही वाचा- मी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा