Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: प्रवीण दरेकरांचे सरकारला १२ प्रश्न

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला १२ प्रश्न विचारले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: प्रवीण दरेकरांचे सरकारला १२ प्रश्न
SHARES

पूजा चव्हाण यांच्या आत्म'हत्या' प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना माझे काही प्रश्न आहेत...मविआ सरकारकडून जनतेसह सर्वांनाचं या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत, असं म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला १२ प्रश्न विचारले आहेत.

प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर १२ प्रश्नांचं पत्र ट्विट केलं आहे. या पत्रात ते म्हणतात, ७ फेब्रुवारी २०२१ रोजी परळीतील युवती आणि सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिचा पुणे इथं संशयास्पदरित्या मृत्यू झाला. याच प्रकरणातील काही आॅडियो क्लिप्स व्हायरल झाल्या असून पूजा चव्हाण मृत्यूबाबत संशय निर्माण करणाऱ्या बाबी प्रथमदर्शनी निदर्शनास आल्या आहेत. 

हेही वाचा- “परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’”

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे. चौकशी करण्यात येईल अशी घोषण मुख्यमंत्री यांनी केली आहे. यानंतर अनेक संशय निर्माण करणाऱ्या, प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्ती असुरक्षीत असल्याच्या घटना घडल्या आहेत. 

परंतु आतापर्यंत तपासाची प्रगती वगैरे बाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जनतेला दिलेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये विशेषत: महिलांमध्ये भीतीचं, असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या आणि जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत, किमान आपणापैकी कुणीही तातडीने याबाबत जनतेला अवगत करावं, अशी माझी मागणी आहे.

पोलीस महासंचालक म्हणून आपण पोलीस प्रशासनाचे प्रमुख आहात. मृत पूजा चव्हाण तपास प्रकरणी होत असलेल्या चालढकलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष आहे. तरी या प्रकरणी निर्माण झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने तात्काळ तपास करून मृत तरूणीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी पत्रातून केली आहे.

(bjp leader pravin darekar ask question to MVA government on pooja chavan suicide case)

हेही वाचा-  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: मुख्यमंत्र्यांची मूक संमती?, भाजपचा सवाल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा