मुंबई महापालिका निवडणुकीच्या (bmc election 2022) पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक अनिल कदम आणि माजी नगरसेविका प्रेसिला कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोघांनाही शिवबंधन बांधलं.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर त्याआधी काँग्रेस नेते दिवंगत गुरूदास कामत यांचे भाचे समीर नाईक यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधलं होतं.
त्या पाठोपाठ शिवसेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसंच भाजपप्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा- ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
सायन कोळीवाड्यातील माजी नगरसेवक प्रीसिल्ला कदम जी आणि अनिल कदम जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/0Kr9Lg3a7X
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 8, 2021
कदम यांचा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजप स्वबळावर मुंबई महापालिकेत भगवा फडकवण्याची तयारी करत असताना दुसरीकडे मात्र भाजपात (bjp) मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरु झाल्याचं दिसत आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.
सध्या भाजपमध्ये असलेले आमदार कालिदास कोळंबकर हे आधी शिवसेनेत होते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकिटावर ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आमदारकी मिळवली. जुन्या शिवसैनिकांनाही पुन्हा स्वगृही परत आणण्यासाठी शिवसेनेनं प्रयत्न सुरू केलेले असताना कोळंबकर यांच्या गडालाही हादरा बसला आहे.
(bjp leader presila kadam and anil kadam joins shiv sena ahead of bmc election)
हेही वाचा- पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे 'या' भागात पाणीपुरवठा खंडित