Advertisement

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतेज पाटील यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
SHARES

ठाकरे सरकारमधील गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतेज पाटील यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यापाठोपाठ आता गृहराज्यमंत्रीही कोरोनाबाधित झाल्याने एकाच खात्यातील दोघा मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं ट्विट सतेज पाटील (satej patil) यांनी केलं आहे. 

सतेज पाटील यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती ठीक असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा- मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

सद्यस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख देखील क्वारंटाईन आहेत. अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस दलाची बैठक घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी परिवार संवाद या पक्षीय कार्यक्रमात देखील ते उपस्थित होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील सर्वच महत्त्वाचे पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केल्याने सर्वांमध्ये खळबळ उडाली होती. 

याआधी ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, उदय सामंत, यांनीही कोरोनाची (coronavirus) लागण झाली होती. पण, योग्य उपचारांनंतर या मंत्र्यांनी करोनावर मात करून पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली.

(maharashtra home state minister satej patil tested coronavirus positive)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा