SHARE

दादर - भाजपाच्या शहर कार्यालयामध्ये मुंबई भाजपाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांची शनिवारी महत्वाची बैठक झाली. या वेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकासंदर्भात चर्चा झाली. बैठकीमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूकीमध्ये कोणत्या प्रकारचे मुद्दे असणार?, या मुददयांवर कशाप्रकारे प्रतिउत्तर द्यायचे?, वॉर्डनिहाय काय मुद्दे असणार?, भाषिक, सामाजिक, जातीय या मुद्दांवर कशाप्रकारे आपल्या पक्षाची भूमिका मांडणे याबाबत विचार विनिमय करण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या