Advertisement

किमान मुंबई तरी सांभाळून दाखवा, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जे मुंबईला सांभाळू शकत नाहीत, त्यांनी देश संभाळण्याच्या विषयात पंतप्रधानांना मार्गदर्शन करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे! अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

किमान मुंबई तरी सांभाळून दाखवा, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
SHARES

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्म येत आहेत. तसाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा महाविजय मेळावा म्हणजे ओटीटीवरचा महा फ्लॉप शो होता. जे मुंबईला सांभाळू शकत नाहीत, त्यांनी देश संभाळण्याच्या विषयात पंतप्रधानांना मार्गदर्शन करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे! अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांना आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण जळफळाटातून निर्माण झालेलं  होतं. त्यामुळे सगळ्या भाषणात फक्त जळफळाट, जळफळाट आणि जळफळाटाचं चित्र होतं! ज्यांना तुम्ही देश सांभाळा म्हणून सांगताय, त्यांना आमचा सवाल आहे की तुम्ही मुंबई तरी सांभाळून दाखवा. शिवडी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू होतो आणि तो कुजेपर्यंत कुणाचंही त्याकडे लक्ष नसतं. घाटकोपरला घरातून चक्कीवर पीठ आणण्यासाठी बाहेर निघालेल्या भगिनीचा गटारात पडून मृत्यू होतो आणि तिचा मृतदेह दूर हजीअलीच्या समुद्रात सापडतो. हा गलथानपणा कुणाचा? त्यामुळे जे मुंबईला सांभाळू शकत नाहीत, त्यांनी देश सांभाळण्याच्या विषयात मार्गदर्शन करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. (bjp mla ashish shelar criticised cm uddhav thackeray shiv sena dussehra rally speech)

हेही वाचा - शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

त्यामुळे जे कर्माने पडणार आहेत त्यांना धर्माने पडण्याची गरज नाही! तुम्ही स्वतः च्या कर्माने पडणार आहात. आम्ही पाडण्याचा प्रश्नच येत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. 

मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देताय, त्यातलं थोडसं लक्ष तुम्ही देशावर द्या! आज देश रसातळाला चाललाय. जे काही चालले आहे संपूर्ण देशात, हे फार विचित्र चाललं आहे. कोरोनाचे संकट आहेच, जगभरात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये भाजपला रस असेल तर मला असं वाटतं की, आपण अराजकाला आमंत्रण देत आहोत, अशा शब्दांत दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा