Advertisement

सर्वांसाठी लोकल की सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक?

लोकल ट्रेन प्रवासासाठी सर्वसामान्यांना दुपारच्या वेळेची अट घालून दिल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सर्वांसाठी लोकल की सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक?
SHARES

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्य सरकारने लोकलचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय शुक्रवार २९ जानेवारी २०२१ रोजी घेतला. परंतु लोकल ट्रेन प्रवासासाठी सर्वसामान्यांना दुपारच्या वेळेची अट घालून दिल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर लोकल प्रवासासाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा म्हणजे सर्वसामान्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्ष भाजपने (bjp) केली आहे.

या निर्णयावर संताप व्यक्त करताना भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर म्हणाले, लोकल ट्रेनची खरी गरज सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत असताना, सर्वसामान्यांना केवळ दुपारी आणि रात्रीच्या वेळेत प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद आणि निरर्थक आहे. राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ पूर्णवेळ लोकल सुरु न केल्यास भाजप तर्फे जनआंदोलन उभं केलं जाईल, असा इशारा देखील अतुल भातखळकर यांनी दिला.

हेही वाचा- चाकरमान्यांसाठी गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा

सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असं कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) सातत्याने देत असतात. पण दुसरीकडे याच ठाकरे सरकारने दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन जीवनवाहिनीचं काम करते. त्यामुळे सगळ्यांचा विचार करून सरकार निर्णय घेईल, असं वाटत होतं. परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या (mumbai) मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केलं आहे, अशी टीका देखील अतुल भातखळकर यांनी केली.

दरम्यान, १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसंच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. शिवाय मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची तसंच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देखील दिली आहे. 

(bjp mla atul bhatkhalkar criticized maharashtra cm uddhav thackeray over mumbai local train timing)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा