Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

२६/११ प्रकरणाची फेरचौकशी करा, भाजपच्या नेत्याची मागणी

२६/११ च्या संपूर्ण प्रकरणाची फेरचौकशी करावी, अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजप आमदार अतुल भातखळकर (bjp mla atul bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

२६/११ प्रकरणाची फेरचौकशी करा, भाजपच्या नेत्याची मागणी
SHARES

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (26/11 mumbai terrorist attack) संपूर्ण प्रकरणाची फेरचौकशी करावी, अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजप आमदार अतुल भातखळकर (bjp mla atul bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबईवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला (terrorist ajmal kasab) हिंदू दाखवण्याचा पाकिस्तानचा डाव होता, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया (rakesh maria) यांनी आपल्या ‘let me say it now’ या पुस्तकात केला आहे. मारिया यांच्या गौप्यस्फोटानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे.

हेही वाचा- भाजपच्या काळात ३३ कोटी वृक्ष लागले? सरकार करणार चौकशी

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर या पोलीस अधिकाऱ्यांना कसाबने नाही, तर हिंदू दहशतवाद्यांनी (hindu terrorist) मारल्याचा खोटा आणि गलिच्छ प्रचार काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे असा खोटा आरोप करणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी भातखळकर (bjp mla atul bhatkhalkar) यांनी या पत्राद्वारे केली आहे.

जो पक्ष मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी प्रज्ञासिंग ठाकूर (pradnya singh thakur) यांना उमेदवारी देतो, त्यांनी असे आरोप करु नयेत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (congress spokesperson) यांनी भातखळकर यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब (ajmal kasab) या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना (mumbai police) यश आलं होतं. त्याच्या झाडाझडतीत पोलिसांना एक ओळखपत्र मिळालं होतं. त्या ओळखपत्रावर समीर चौधरी असं नाव लिहिलं होतं. त्यावर बंगळुरुचा पत्ता होता. तर तो हैदराबादमधील एका काॅलेजचा विद्यार्थी असल्याचं त्यावर लिहिण्यात आलं होतं. या तपासासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक बंगळुरुला रवाना देखील करण्यात आलं होतं. या सर्व प्रकरणाच्या चौकशीत पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय (isi) ही दहशतवादी कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत होती, असा निष्कर्ष मारिया यांनी आपल्या पुस्तकात काढला आहे.     

हेही वाचा- शीना बोरा हत्या प्रकरणात सहकाऱ्यांनीच विश्वास घात केला - राकेश मारिया

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा