Advertisement

लोकल ट्रेनच्या वेळा ठरवताना सरकारला सर्वसामान्यांची चिंता की बारवाल्यांची?

सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची वेळ ठरवताना सरकारने सर्वसामान्यांची चिंता केली की बारवाल्यांची? असा प्रश्न भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ट्रेनच्या वेळा ठरवताना सरकारला सर्वसामान्यांची चिंता की बारवाल्यांची?
SHARES

येत्या १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकल ट्रेनचे दरवाजे खुले होत आहेत. परंतु सर्व प्रवाशांना प्रवासाची मुभा देताना वेळेची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, त्यावरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. ही वेळ ठरवताना सरकारने सर्वसामान्यांची चिंता केली की बारवाल्यांची असा प्रश्न भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी उपस्थित केला आहे.

सरकारवर टीका करताना राम कदम म्हणाले, लोकल ट्रेन ५ महिने उशिरा सुरू करण्याचा #महाराष्ट्रसरकार चा निर्णय,सरकारची निष्काळजीपणा दाखवतो , #मंदिरा अगोदर #बार उघडण्याची घाई करणारे  #MVA सरकार या गोष्टीचे उत्तर कधी देणार ? सकाळी ७ च्या अगोदर रात्री ९.३०  नंतर या ट्रेन चा फायदा कोणाला ? का पुन्हा एकदा #बारवाल्याची चिंता?

सरकारच्या निष्काळजीपणामुळे लाखो लोकांना नुकसान झालं, दूर राहणाऱ्यांच्या नोकर्‍या गेल्या, बदल्यांच्या पाठीमागे लागलेलं हे सरकार, जनतेच्या प्रति गांभीर्य कधी दाखवणार? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- सर्वांसाठी लोकल की सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक?

त्याआधी लोकल ट्रेनची खरी गरज सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत असताना, सर्वसामान्यांना केवळ दुपारी आणि रात्रीच्या वेळेत प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद आणि निरर्थक आहे. राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ पूर्णवेळ लोकल सुरु न केल्यास भाजप तर्फे जनआंदोलन उभं केलं जाईल, असा इशारा भाजप (bjp) आमदार अतुल भातखळकर यांनी दिला.

दरम्यान, १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसंच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. शिवाय मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची तसंच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देखील दिली आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा