Advertisement

महाराष्ट्रात दिवाळीनंतर सरकारचेच फटाके वाजणार- नारायण राणे

महाराष्ट्रात दिवाळीनंतर सरकारचेच फटाके वाजतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात दिवाळीनंतर सरकारचेच फटाके वाजणार- नारायण राणे
SHARES

ठाकरे सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार आपण योग्य वेळी बाहेर काढू, असं म्हणत महाराष्ट्रात दिवाळीनंतर सरकारचेच फटाके वाजतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. 

मुंबईतील फटाकेबंदीच्या निर्णयावरून टीका करताना एका वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुलं, मोठे लोकं फटाके वाजवून आनंद साजरा करतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा (coronavirus) एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे, असं नारायण राणे यांनी सांगितलं.

पिंजऱ्यात बसून फक्त हात धुवा आणि अंतर ठेवा यापलिकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. कारण राज्याचा त्यांना अभ्यास नाही. मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. 

हेही वाचा- मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी, फक्त 'या' दिवशीच मुभा

सध्या ठाकरे कुटुंबावर जमीन व्यवहाराचे जे आरोप होत आहेत, त्याकडे नक्कीच गांभीर्याने बघायला हवं. यापेक्षाही आणखी ठाकरे कुटुंबीयांचे जमीन व्यवहार आहेत. दिवंगत बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशीप नव्हती. पण आता मातोश्रीवर देवाण-घेवाण करुन व्यवहार होतात. त्यात आमदार, खासदारांना काहीच स्थान नाही, असा गंभीर आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, दिवाळीवर कोरोनाचं सावट असल्यानं राज्य सरकार व महापालिकेनं खबरदारी घेण्याचं आवाहनं केलं आहे. 'दिवाळी' म्हटलं तर फटाक्यांची आतषबाजी (firecrackers) डोळ्यासमोर येते. परंतू, यंदा कोरोनामुळं फटाके मर्यादित स्वरूपात फोडण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं आहे. त्याशिवाय, फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करणं यावर बंदी घालण्यात आली आहे.

(bjp mp narayan rane criticises maharashtra cm uddhav thackeray over ban on firecrackers during diwali)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा