Advertisement

पूनम महाजन म्हणतात 'उत्तर भारतीय मुंबईची शान'


पूनम महाजन म्हणतात 'उत्तर भारतीय मुंबईची शान'
SHARES

‘उत्तर भारतीय मुंबईची शान असून, त्यांच्याअभावी ५० टक्के मुंबई बंद पडेल', असे वक्तव्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन यांनी करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. साकीनाका येथे साई-श्रद्धा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय संमेलनादरम्यान महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे.


उत्तर भारतीय नागरिक मेहनती 

मनसेकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पूनम महाजन म्हणाल्या, 'भाषा आणि प्रांताच्या नावावर देशाचे विभाजन होता कामा नये. उत्तर भारतीय नागरिक मेहनती आहेत. जर उत्तर भारतीयांनी मुंबईची स्वप्ने पाहिली नाहीत, तर ५० टक्के मुंबई अशीच बंद पडेल. त्यामुळे त्यांच्या शक्तीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उत्तर भारताने देशाला मोठमोठे नेते दिले आहेत, हे विसरता कामा नये'. याच उत्तर भारतात माझ्यासारख्या मराठी मुलीलाही भरपूर प्रेम मिळत आहे', असे त्यांनी सांगितले.


'पूनम महाजन आणि भाजपा मुंबईची घाण'

दरम्यान पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा मनसेने खरपूस समाचार घेतला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पूनम महाजन आणि भाजपा मुंबईची घाण असल्याची टीका केली आहे.


मुंबई वाढवण्याचे काम मराठी माणसांनी केले आहे. असे असताना स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी हे असं वक्तव्य भाजपा करत असेल तर भाजपा आणि पूनम महाजन मुंबईची घाण आहे. यांना मराठी माणूसच योग्य उत्तर देईल.

- संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा