कोल्हापूर विद्यापीठाचा नामविस्तार करा, संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळून अशा स्थळांचा नामविस्तार करा, अशी मागणी करणारं पत्र खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री ​उद्धव ठाकरे​​​ यांना पाठवलं आहे.

SHARE

महाराष्ट्रातील अनेक सार्वजनिक स्थळांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आढळून येतो, त्यामुळे हा एकेरी उल्लेख टाळून अशा स्थळांचा नामविस्तार करा, अशी मागणी करणारं पत्र खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

हेही वाचा- ‘सनातन’वर बंदी घाला, हुसेन दलवाई यांची मागणी

आपल्या पत्रात संभाजीराजेंनी लिहिलं आहे की, मागील माही दिवसांपासून महाराजांच्या नावाच्या एकेरी उच्चारावरुन बरीच चर्चा होत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन असो की केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद शिवप्रेमींनी महाराजांच्या नावाच्या चुकीच्या उच्चारणाबद्दल दोघांनाही जाब विचारला आहे. तेव्हा ज्या सार्वजनिक स्थळांवर ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख आहे, त्याचा नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज असं नामकरण करण्यात यावं.

तसंच मराठा आरक्षण आंदोलनात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांविरोधात सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.    

संबंधित विषय
ताज्या बातम्या