युतीसाठी भाजपाकडून 50-50 चा फॉर्म्युला

मुंबई - पालिका निवडणुकीचं बिगूल वाजलंय. पण सध्या सगळ्यांची नजर आहे ती शिवसेना-भाजपा युतीकडे. हे दोन्ही पक्ष राज्यासह केंद्रात सत्तेवर आहेत. मात्र पालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का हा खरा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची वाढलेली ताकद पाहता भाजपाने शिवसेनेसमोर 50-50 फॉर्मुल्याचा प्रस्ताव ठेवलाय. सध्या जरी दोन्ही पक्षांकडून युतीची सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जातं असलं तरी सर्वस्वी निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री घेणार असल्याचंच सांगितलं जातंय. सध्या दोन्ही पक्षांकडून पारदर्शकतेवर चर्चा होत असली तरी, पालिका निवडणुकीसाठी युती पारदर्शकपणे होतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading Comments