बोरिवली - येथील नॅन्सी कॉलनीत अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिवाळी पाडवा-पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी ' स्पंदन आर्ट क्रिएट्स प्रस्तुत सूर निरागस हो' ही मराठी भक्ती-भावगीतांची मैफल गायक सौरभ वखारे, दिलीप वझे, अनिल पडवळ यांनी सादर केली. अनघा तांडेल यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या वेळी अभिनेते निशा परुळेकर, गायक अमोल बावडेकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक प्रकाश दरेकर, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाददादा पै आदीही उपस्थित होते.