भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबीर

 Andheri
भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबीर
भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबीर
भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबीर
भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबीर
भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबीर
See all

अंधेरी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंधेरी पूर्व येथे भाजपाच्यावतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. भाजपाच्या महामंत्री महिला मोर्चाच्या समिधा राणे यांच्यावतीनं या शिबिराचं मरोळ येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आर.जी.स्टेनरूग्णालय, संघवी, सोमय्या, ज्यूपिटर, प्लॅटीनम, हिंदुसभा या रुग्णालयांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. स्त्रीरोग चिकित्सा, हृदयविकार, संसर्गजन्य आजारांवर या शिबिरात उपचार करण्यात आलेत. या शिबिराचा 200-250 नागरिकांनी लाभ घेतला. मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या उपाध्यक्षा समिधा राणे वॉर्ड क्र. 75 मधून भाजपातर्फे निवडणूक लढवतायेत. मानवी जिवनात आरोग्याचे अमूल्य स्थान आहे. मुंबईकरांचे रोजचे जीवन धावपळीचे आणि धकाधकीचे आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणार होतो हे जाणूनच आम्ही हा अभिनव उपक्रम राबवत असल्याचं उमेश राणे म्हणालेत.

Loading Comments