पाकिस्तानविरोधात भाजपाची निदर्शने

 Azad Maidan
पाकिस्तानविरोधात भाजपाची निदर्शने
पाकिस्तानविरोधात भाजपाची निदर्शने
See all

रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचसाठी बुधवारी भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चा विभागाच्या वतीन आझाद मैदानात पाकिस्तान विरोधात निदर्शने करण्यात आली. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, त्यांची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चा विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये करण्यात आली.

सरकारने जाधव यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून सुखरूप मायदेशी आणावे अशी आमची मागणी असल्याचे वसीम खान यांनी यावेळी म्हटले. यावेळी नगरसेवक आकाश राज पुरोहित, वसीम खान तसेच भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments