Advertisement

महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

दिग्गज नेत्यांचा पत्ता उमेदवारीच्या शर्यतीतून कट झाल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर
SHARES

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे पाटील यांच्यासह . महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवरांची यादी जाहीर झाली आहे. भाजपची दुसरी यादी अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. 

नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांसह राज्यातून मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार त्यांची नावे या यादीत आली आहेत. 

यासोबतच उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, कर्नाटकातील उमेदवारांची नावं आज जाहीर होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. 

महाराष्ट्र भाजपची यादी जाहिर

  • नंदुरबार - हिना गावित
  • धुळे - सुभाष भामरे
  • जळगाव - स्मिता वाघ
  • रावेर - रक्षा खडसे
  • अकोला - अनुप धोत्रे
  • वर्धा - रामदास तडस
  • नागपूर - नितीन गडकरी
  • चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
  • नांदेड - प्रतापराव चिखलीकर
  • जालना - रावसाहेब दानवे
  • दिंडोरी - भारती पवार
  • भिवंडी - कपिल पाटील
  • मुंबई उत्तर - पियुष गोयल
  • मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा
  • पुणे - मुरलीधर मोहळ
  • अहमदनगर - सुजय विखे पाटील
  • लातूर - सुधाकर सुंगारे
  • बीड - पंकजा मुंडे
  • माढा - रणजित नाईक निंबाळकर
  • सांगली - संजय काका पाटील

भाजपच्या यादीत यांना उमेदवारी नाही

  • जळगाव - उन्मेश पाटील
  • उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी
  • उत्तर पुर्व - मनोज कोटेक
  • चंद्रपूर - हंसराज अहिर
  • बीड - प्रितम मुंडे



हेही वाचा

अहमदनगरचे नाव पुन्हा एकदा बदलले, जाणून घ्या नवीन नाव

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला 17 मार्चनंतरच जाहीर होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा