Advertisement

टॅक्सी-रिक्षाचालकांसोबत भाजपची मोर्चेबांधणी


टॅक्सी-रिक्षाचालकांसोबत भाजपची मोर्चेबांधणी
SHARES

प्रेमनगर- आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने टॅक्सी रिक्षाचालकांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरु केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गोरेगावची ओळख आहे. या गोरेगावातील प्रेमनगर येथे भाजपकडून मुंबईतील टॅक्सी- रिक्षा चालकांसाठी पंडित दिन दयाल स्वास्थ सारथी अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या अभियानाचे उदघाटन करण्यात आले. महानगर गैस लिमिटेड आणि वैद्यकीय विकास मंच यांंच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले.

या अभियानाअंतर्गत 5 रिक्षा चालकांना सीएनजी कीट ,50 रुपयांचे कुपन, 10 लाभार्थी महिलांना आणि कोळी बांधवांना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. या अभियानाद्वारे टॅक्सी रिक्षाचालकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व टॅक्सी रिक्षा चालकांचा डिजीटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. सर्व टॅक्सी रिक्षा चालकांचा औषधोपचाराचा संपूर्ण खर्च शासन करेल. तसेच नंदुरबार सारख्या जिल्हा केरोसिन मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील 24 जिल्ह्यांना मुंबई महामार्गाने जोडणार असल्याची घोषणा यावेळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. यावेळी राज्यमंत्री विदया ठाकूर, आमदार आशिष शेलार, अमित साटम, खासदार गोपाळ शेट्टी तसेच महानगर गॅसची अधिकारी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा