Advertisement

ही बाळासाहेबांची शिवसेना नसून औरंगजेबसेना आहे- भाजप

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून आता ती औरंगजेबसेना झालेली आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

ही बाळासाहेबांची शिवसेना नसून औरंगजेबसेना आहे- भाजप
SHARES

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून आता ती औरंगजेबसेना झालेली आहे, अशी बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्यापासून जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा देखील तापायला लागला आहे. औरंगाबद महापालिकेची सत्ता भाजपच्या (bjp) ताब्यात दिल्यास दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव पारीत करून औरंगाबादचं नामांतर करून, असं आश्वासन नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. त्या पाठोपाठ केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, शिवसेनेचं औरंगाबादच्या नामकरण विषयीच धोरण पहाता, मला औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते. शिवसेनेची बोलायची भाषा वेगळी आहे आणि कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबासारख वागते. 

हेही वाचा- शहरांची नावं बदलून विकास होत नाही, राष्ट्रवादीची परखड भूमिका

अनेकांना देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना नामकरण का झालं नाही? हा प्रश्न पडला आहे. तर मा.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना औरंगाबादच नामकरण संभाजीनगर व्हावं, यासाठी प्रयत्न झाले सलग ४,५ पत्र पाठवण्यात आली. सरकार सातत्याने अहवाल मागत होतं, असा खुलासा देखील केशव उपाध्ये यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेने (shiv sena) औरंगाबाद जिल्ह्याचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठी जोर लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसने (congress) या नामांतराला विरोध केला आहे. नामांतराचा मुद्दा तापलेला असताना आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मलिक म्हणाले की, औरंगाबादचं नामांतर वा कुठल्याही शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील विषय नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही. त्यामुळे याबाबत वेगळं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.

(bjp spokesperson keshav upadhye criticises shiv sena over name change issue of aurangabad)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा