Advertisement

म्हणून चंद्रकात पाटलांनी पोलिस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला


म्हणून चंद्रकात पाटलांनी पोलिस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला
SHARES

कोरोना बाधित रुग्णांचा आकडा महाराष्ट्रात वाढत असताना, या संसर्गजन्य रोगापासून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या यंञणांवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. म्हणूनच गरज नसताना ही पोलिस सुरक्षा न ठेवता, ती परत करण्याचा निर्णय चंद्रकात पाटील यांनी घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि पोलिसांवर मोठा भार आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिस संरक्षण परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, देशात संचारबंदी लागू आहे. याचा पोलिस प्रशासनावर ताण पडत आहे. याचा विचार करून परिस्थिती नियंत्रणात येईपयर्ंत मी माझी पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपयर्ंत सर्वांनी घरातच बसावे असे आवाहन मोदींनी केले आहे. कोरोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्या लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले होते.


दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक जबाबदारी स्वीकारत राज्य आणि केंद्राला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतलाय. विधीमंडळातील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयापाठोपाठ शिवसेनेही आपल्या आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले. ही मदत जाहीर करताना कोरोना विरुध्दच्या लढाईत हा आमचा खारीचा वाटा आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा