Advertisement

मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा, शिवसेनेचा आरोप

मनसेच्या मोर्चामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप शिवसेनेनं केल्यामुळे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे.

मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा, शिवसेनेचा आरोप
SHARES

मनसेच्या मोर्चामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप शिवसेनेनं केल्यामुळे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. 

देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातून शेकडो मनसैनिक मुंबईत येऊन दाखल झाले आहेत.

'शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्याने भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात एकटा पडला आहे. त्यामुळे भाजप सातत्याने जोडीदाराची चाचपणी करत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या आधी भाजपने वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग मधल्या काळात करून पाहिला. पण हा प्रयोग चांगलाच फसला. त्यामुळं भाजपने आता हिंदुत्वाच्या वाटेवर असलेल्या मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. आधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांची घेतलेली भेट हा त्याचा पुरावा आहे. या भेटीगाठीच्या माध्यमातून भाजप मनसेच्या मोर्चाला छुपा पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट हाेत आहे,' असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या अॅड. मनीषा कायंदे यांनी मनसेवर केला.

आता मनसेकडून शिवसेनेच्या आरोपांना काय प्रतिउत्तर देण्यात येतं ते पाहावं लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा