महापालिकेच्या घोटाळेबाज कारभारामुळे बेस्टची अधोगती - माधव भांडारी

 Mumbai
महापालिकेच्या घोटाळेबाज कारभारामुळे बेस्टची अधोगती - माधव भांडारी

दादर - 2010 या वर्षी 42 लाख प्रवासी बेस्टचा सुरक्षित प्रवास करीत होते, मात्र गेल्या सात वर्षांत 28 लाख प्रवासी बेस्टने प्रवास करत आहेत. म्हणजे बेस्टची प्रगती होण्याऐवजी गेल्या सात वर्षांत बेस्टची अधोगती झाली आहे ही केवळ महापालिकेच्या घोटाळेबाज कारभारामुळे झाल्याचे सांगत भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. बेस्ट दावा करते की त्यांच्याकडे 7 हजार बस आहेत. मात्र बेस्टचा दावा साफ खोटा आहे. बेस्टकडे केवळ 3800 बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारण 400 ते 450 बस दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ 3 हजार 400 पेक्षा जास्त बस रस्त्यावर धावत नाहीत. फक्त अर्थसंकल्पातील निधी वाढवून बिलांचे आकडे वाढविण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याची टिका देखील भांडारी यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गतिमान कारभार, विकासाला चालना, भ्रष्ट्राचारावर कारवाई आणि महानगरपालिकेत स्वच्छ पारदर्शी कारभार असावा या उद्देशाने कार्य करीत आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना हा स्वच्छ पारदर्शी कारभार नको असल्याने भाजपाला एकत्रित लक्ष करण्याचे प्रयत्न विविध ठिकाणच्या जाहीर सभेत करीत आहेत.

Loading Comments