'भाजपाने निवडणुकीत काळा पैसा वापरला'

  Vidhan Bhavan
  'भाजपाने निवडणुकीत काळा पैसा वापरला'
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपतर्फे काळ्या पैश्याचा सर्रास वापर झाल्याची तक्रार मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपले शिष्टमंडळ घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल आपल्या समोर आहे. त्या निकालाबद्दल शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये एक बातमी छापून आली आहे की, या निवडणुकांमध्ये भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद केलेल्या 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांचा सर्रास वापर मतदारांना विकत घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी केला. सामना हे वर्तमानपत्र शिवसेनेचे आहे आणि उद्धव ठाकरे त्याचे संपादक आहेत आणि शिवसेना हा पक्ष भाजपाचा सत्तेतील सहयोगी पक्ष आहे. त्यामुळे या आरोपांना गंभीरतेने घेणं गरजेचे आहे. भाजपावर जे आरोप आहेत, त्या सर्व प्रकरणाची निवडणूक आयोगाने उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्याचे आणि संबंधितांना योग्य ते शासन करण्याचे आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आम्हाला दिले, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.