Advertisement

देवेंद्र फडणवीस अडचणीत, शपथपत्रप्रकरणी फौजदारी खटला चालणार

फडणवीसांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) फेटाळून लावल्याने त्यांच्याविरोधात नागपूर कनिष्ठ न्यायालयात फौजदारी खटला चालणार आहे.

देवेंद्र फडणवीस अडचणीत, शपथपत्रप्रकरणी फौजदारी खटला चालणार
SHARES

निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. फडणवीसांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) फेटाळून लावल्याने त्यांच्याविरोधात नागपूर कनिष्ठ न्यायालयात फौजदारी खटला चालणार आहे. 

हेही वाचा- ‘या’ प्रकरणात फडणवीस यांना जामीन मंजूर

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर करण्याच्या प्रतिज्ञापत्रात (election affidivate) १९९६ ते १९९८ दरम्यानच्या २ फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याची तक्रार सतीश उके यांनी यांनी केली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत खटला चालवण्याची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली होती. या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला होता. 

दोन आठवड्यांपूर्वीच या खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नागपूर न्यायालयाने समन्स बजावलं होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर झाले. या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

अखेर सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांची फेरविचार याचिका फेटाळल्याने त्यांच्यावर नागपूर प्रथमश्रेणी न्यायालयात फौजदारी खटला चालणार आहे.

हेही वाचा- आदित्य ठाकरेंनी तुमच्यासारखा गायनाचा छंद जोपासला नाही, शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा