Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

आदित्य ठाकरेंनी तुमच्यासारखा गायनाचा छंद जोपासला नाही, शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांच्यावर शिवसेनेने (shiv sena) पलटवार केला आहे. वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत, असं म्हणत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (manisha kayande) यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरेंनी तुमच्यासारखा गायनाचा छंद जोपासला नाही, शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला
SHARE

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Tourism minister aaditya thackeray) यांना रेशमी किड्याची उपमा देत त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांच्यावर शिवसेनेने (shiv sena) पलटवार केला आहे. वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत, असं म्हणत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (manisha kayande) यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा-  फडणवीसजी आधी माफी मागा, आदित्य ठाकरे संतापले

भाजपच्या (bjp) एल्गार आंदोलनादरम्यान आझाद मैदानात भाषण करताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी एमआयएमचे नेते वारीस पठाण (mim leader waris pathan) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेवर (shiv sena) टीका केली होती. उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. जशास तसं उत्तर कसं देतात हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे, असं फडणवीस म्हणाले होते. 

त्यावर नाराजी व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. मनानं सर्वाधिक मजबूत असलेल्या महिला बांगड्या घालतात. ते कुठल्याही कमकुवतपणाचं लक्षण नाही. फडणवीसांनी आपली मानसिकता बदलावी आणि आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. 

त्यानंतर अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना (Tourism minister aaditya thackeray) उद्देशून,'रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,' अशा शब्दांत टीका केली होती.

हेही वाचा- ‘हिशोब' मांडावाच लागेल, आदित्य ठाकरेंना मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा

त्या शिवसेनेच्या नेत्या अॅड. मनिषा कायंदे (shiv sena leader manisha kayande) यांनी उत्तर दिलं. आदित्य ठाकरे हे प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेले नेते आहेत. वडील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे,' असं म्हणत कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या