Advertisement

'सीएम नळावरच्या बायकांसारखे भांडतात'


'सीएम नळावरच्या बायकांसारखे भांडतात'
SHARES

सीएसटी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा भांडतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यातील मावळ येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपच्या मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा शलाका साळवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणार होत्या. मात्र याचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी त्यांना वाल्मिकी चौकातच रोखले. मात्र या महिला कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंच्या फोटोला शाई फासल्याने पोलिसांनी भाजप महिला कार्यकर्त्यांना अटक केली. हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे फोटो फाडले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा