शिवसेनेला 'गंभीर' धक्का

 Dadar
शिवसेनेला 'गंभीर' धक्का
शिवसेनेला 'गंभीर' धक्का
See all
Dadar , Mumbai  -  

दादर - महापालिका निवडणुका जवळ येताच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरात सुरूये. शिवसेनेचे बेस्ट कामगार सेना नेते आणि बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य आणि माजी आमदार सुरेश गंभीर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. "मोदीजींच्या कामामुळे प्रभावित झालो. तसंच शिवसेनेपेक्षा हिंदू आणि गोरगरिबांचे काम भाजपा करेल," अशी आशा माजी आमदार सुरेश गंभीर यांनी व्यक्त केली.

भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत सुनील गणाचार्य यांनी भाजपात प्रवेश केला. या वेळी भाजपाचे खासदार किरीट सौमय्या यांच्या व्यंगचित्रावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

"ज्यांनी पोस्टर लावले त्यांनी पुरुषार्थ दाखवून जवाबदारी स्वीकारावी, तेव्हा आम्ही उत्तर देऊ," असं स्पष्ट मत शेलार यांनी व्यक्त केलं.

Loading Comments