Advertisement

मुंबईत महापौरपदाचा शिवसेनेचा मार्ग मोकळा


मुंबईत महापौरपदाचा शिवसेनेचा मार्ग मोकळा
SHARES

मलबार हिल - येत्या 8 मार्चला होणाऱ्या मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीवरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. भाजपा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देणार नसल्याने पालिकेत आता शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या शर्यतीत उतारायचं नाही. मुंबईच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करू, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. 

तसेच भाजपाचे नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावतील. पारदर्शकतेच्या मुद्द्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभार आणण्यासाठी एक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. त्या समितीच्या शिफारशींनुसार राज्य सरकार मुंबई महापालिकेला मदत करेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्या आहेत. कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने हा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा