Advertisement

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपा चांगलाच आक्रमक झाला आहे.

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार
SHARES

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपा चांगलाच आक्रमक झाला आहे. मुंबईत मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे मोर्चा निघणार आहे. ९ मार्च रोजी हा मोर्चा प्रदेश भाजपतर्फे निघणार आहे. भायखळ्यातील राणीची बाग ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याचं समजतं.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडी कोठडीत आहे. नवाब मलिकांवरील इडीच्या कारवाईनंतर आता भाजपानं नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची केली आहे. तसंच, राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भाजपानं गुरुवारी गोंधळ घातला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कुविख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक संबंधांच्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटक झाली आहे. नैतिकदृष्ट्या त्यांना आता मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. सरकारने त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी आणि निषेधाचे फलक दाखवत कामकाजात व्यत्यय आणला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी गुरुवारी विधान परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, या गदारोळाकडे दुर्लक्ष करीत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसाचे कामकाज पूर्ण केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला.

देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि बॉम्बस्फोटातील आरोपींशी जागेचा व्यवहार करणाऱ्या मलिक यांची प्रवृत्ती जनता पाहत आहे, महाराष्ट्राचा अवमान होत असल्याचे सांगत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी बाकांवरून सुरू झाली. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेधाचे फलक फडकविले; तर, काही सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. मात्र, सभापतींनी विरोधकांचे कोणतेच विधान रेकॉर्डवर जाणार नसल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा