कांदीवलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वॉटस्अप वॉर

 Kandivali
कांदीवलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वॉटस्अप वॉर

कांदीवली - वॉर्ड क्रमांक 31 चे भाजपाचे इच्छुक उमेदवार कमलेश यादव यांच्या विरोधात वादग्रस्त शब्द वापरल्याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दुसऱ्या तिसऱ्या कुणी केली नसून, त्यांच्याच पक्षातील देवानंद गिरी या कार्यकर्त्याने केली आहे. आधी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला मात्र दबाब टाकताच पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

मनसेचे इच्छुक उमेदवार दिनेश साळवी यांना मदत करत असल्याचा आरोप करत कमलेश यांनी त्याला वॉटस्अपवरून अपशब्द वापरल्याचा आरोप देवानंद गिरी यांनी केलाय. दरम्यान कमलेश यादव यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत निवडणुकांमध्ये असे आरोप कुणी ना कुणी करत राहणार असे सांगत आरोपाचे खंडन केले.

Loading Comments