भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानी झेंडे जाळण्याचा प्रयत्न

 Kandiwali
भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानी झेंडे जाळण्याचा प्रयत्न


कुलभूषण जाधवला पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावल्या प्रकरणी भारतात सर्वत्र नाराजीचे सूर उमटले आहेत. त्याचा प्रत्यय सोमवारी रात्री कांदिवलीत आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कांदिवलीत पाकिस्तानचा विरोध करत पाकिस्तानी झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला. याची माहिती पोलिसांना मिळताच प्रकरण शमवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर सर्वांना सोडले. 

पाकिस्तानने भारतीय माजी नौसैनिक असलेल्या कुलभूषण जाधवला हेरगीरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. ज्याला भारत सरकारकडून विरोध केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यावर तोडगा काढतील आणि कुलभूषण यांना भारतात परत आणतील, अशी आशा सर्वांना लागली आहे.

Loading Comments