भाजपाचा ‘विकास रथ’ मुंबईत धावणार

  मुंबई  -  

  मलबार हिल - मंबई महानगर पालिका. या महानगर पालिकेवर अनेक पक्षांचा डोळा. मात्र यावर गेली कित्येक वर्ष सत्ता गाजवतेय ती शिवसेना-भाजपा युती. यंदा मात्र या पालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरलीय ती भाजपा-शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे. भाजपा शिवसेनेची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. मात्र भाजपाचे मनसुबे आहेत मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर काबीज करण्याचे. त्या दृष्टीने भाजपाने रणनीतीही आखायला सुरुवात केलीय. भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर पालिका निवडणुकीसाठी दंडच थोपाटलेत. त्याचपार्श्वभुमिवर भाजपाच्या विकास कामांची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकास निर्माण रथाची निर्मिती केलीय. आणि याचं उद्घाटन केलंय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.

  विकास रथाचं उद्घाटन करताना उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधीही आशिष शेलार यांनी सोडलेली नाही. युतीबाबात सध्या संभ्रम आहे त्यामुळे विकास निर्माण रथाचं दुसरं चाक भाजपा शिवसेनेला बनवतं का? की विकास रथ एकटा हाकतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.