शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून उद्याच शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाने आपला मोर्चा आता मुंबई महानगरपालिकेकडे वळवला आहे. मुंबई भाजपाने ट्वीट करत शिवसेनेला इशारा दिला आहे.
यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…! असं ट्वीट मुंबई भाजपाने केले आहे. सोबतच विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांचा हातात बॅट घेतलेला फोटोही शेअर करण्यात आला आहे.
यह तो झांकी है....
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) June 29, 2022
मुंबई महापालिका अभी बाकी है...!@Dev_Fadnavis @Devendra_Office @OfficeofUT pic.twitter.com/8BsMSBqR2W
मुंबई पालिकेवर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे. मुंबई महानगरपालिका शिवसेनेची मोठी ताकद मानली जाते. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. शिवसेनेसोबत भाजपानेही या निवडणुकीसाठी कंबर कसल्याची दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजपाने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजापाकडून जल्लोष साजरा केला गेला. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून महाविकास आघाडी सरकार पडल्याचा आनंद व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांकडू निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं.
हेही वाचा